Tuesday 4 October 2016


ओ३म्

ओ३म् सच्चिदानंदेश्वराय नमो नमः

भूमिका


                 ज्यावेळी मी ( महर्षिजी ) हा 'सत्यार्थप्रकाशग्रंथ तयार केला त्यावेळी आणि त्यापूर्वी संस्कृत मधून भाषण करण्याची आणि अध्ययन आणि अध्यापन देखील संस्कृत मधुनच करण्याची आणि माझ्या जन्मभूमिची भाषा गुजराती असल्याने ( हिंदी ) भाषेचे ज्ञान मला विशेष नव्हते. म्हणून भाषा अशुद्ध झाली होती. आता ही भाषा बोलण्याचा लिहिण्याचा मला अभ्यास झाला आहे. म्हणून या ग्रंथाची भाषा व्याकरणानुसार शुद्ध करून तो दुसऱ्यांदा छापविला आहे. काही काही ठिकाणी शब्द वाक्यरचना यांत भेद झाला होता म्हणून तसे करने उचित होते. कारण तसा भेद केल्याशिवाय भाषेची परिपाठी सुधारणे कठीण होते. तथापि अर्थामध्ये भेद केलेला नाही. प्रत्युत तो विशेषतेने लिहिला आहे. प्रथम छापण्यात कोठे कोठे ज्या चुका राहिल्या होत्या त्या काढून सुधारून व्यवस्थित केल्या आहेत.

                हा ग्रंथ १४ समुल्लासात म्हणजे १४ विभागात रचलेला आहे. त्यातील १० समुल्लास पूर्वार्धात असून चार उत्तरार्धात आहेत. परंतु शेवट चे दोन समुल्लास आणि त्यानंतरचे सिद्धांत काही कारणांमुळे पहिल्या आवृत्तित छापु शकले नव्हते. आता ते सुद्धा छापण्यात आले आहेत.

()
तिसऱ्या समुल्लासात ब्रह्मचर्य, पठन-पाठन व्यवस्था, सत्यासत्य ग्रंथांची नावे आणि शिकण्याची आणि शिकविण्याची पद्धति., 
() 
चौथ्या समुल्लासात विवाह गृहस्थाश्रम याचे आचरण.,
() 
पाचव्या समुल्लासात वानप्रस्थ संन्यास आश्रमांचे विधि.,
() 
सहाव्या समुल्लासात राजधर्म.,
()
सातव्या समुल्लासात वेद ईश्वर विषय.,
() 
आठव्या समुल्लासात जगाची उत्पत्ति, स्थिति प्रलय.,
() 
नवव्या समुल्लासात विद्या, अविद्या,बंध मोक्ष यांचीव्याख्या.,
(१०)
दहाव्या समुल्लासात आचार, अनाचार आणि भक्ष्याभक्ष्य विषय.,
(११)
अकराव्या समुल्लासात आर्यावर्तीय मतमतान्तरांचे खंडन मंडन.,
(१२)
बाराव्या समुल्लासात चार्वाक, बौद्ध आणि जैन मतांचे विषय,
(१३)
तेराव्या समुल्लासात ख्रिस्ती मताचा विषय.,
(१४)
चौदाव्या समुल्लासात मुसलमान मताचा विषय, आणि चौदा समुल्लासांच्या शेवटी आर्यांच्या सनातन  वेदविहित मताची विशेषेकरुन व्याख्या लिहिली आहे. जिला मी सुद्धा यथावत मानतो.       

                      हा ग्रंथ लिहिण्याचे माझे मुख्य प्रयोजन सत्य अर्थाचा प्रकाश करणे आहे. अर्थात जे सत्य आहे ते सत्य आणि जे मिथ्या आहे ते मिथ्याच म्हणून प्रतिपादन करणे सत्य अर्थाचा प्रकाश समजला आहे. सत्याच्या ठिकाणी असत्य असत्याच्या ठिकाणी सत्य प्रकाश करणे हे सत्य म्हटले जात नाही, परंतु जो पदार्थ जसा आहे त्याला तसा म्हणणे, लिहिणे मानने सत्य म्हटले जाते. जो माणूस पक्षपाती असतो तो आपले असत्य ही सत्य असल्याचे आणि आपल्या विरोधी मत असणाऱ्या चे सत्य ही असत्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी उद्युक्त होतो. म्हणून त्याला सत्याची प्राप्ति होऊ शकत नाही. म्हणूनच उपदेश किंवा लिखाण यांच्याद्वारे सर्व लोकांसमोर सत्य-असत्याचे स्वरूप उलगडून दाखविणे हे विद्वान आप्तजनांचे मुख्य कार्य आहे. नंतर लोकांनी स्वतः आपले हित अहित ओळखून सत्यार्थ ग्रहण करावा आणि मिथ्यार्थ सोडून सदा आनंदात राहवे.

                      मनुष्याचा आत्मा सत्य-असत्य जाणणारा आहे. तथापि आपला स्वार्थ, हट्ट, दुराग्रह आणि अज्ञान वगैरे दोषांमुळे तो सत्याला सोडून असत्याकडे वळतो परंतु या ग्रंथात असे काही करण्यात आलेले नाही आणि कुणाचे मन दुखवावे अथवा कुणाचे नुकसान करावे असे आमचे तात्पर्य नसून मनुष्य जाती ची उन्नती उपकार व्हावा, माणसांनी सत्य असत्य ओळखून सत्याचा स्वीकार असत्याचा त्याग करावा कारण सत्योपदेशाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीने मनुष्य जातीची उन्नती होऊ शकत नाही.

                   आजकाल प्रत्येक पंथा मधे पुष्कळ विद्वान आहेत. ते पक्षपात सोडून सर्वांना मान्य असणारे सिद्धांत अर्थात सर्वांना अनुकूल असणाऱ्या सत्य गोष्टींचा स्वीकार आणि परस्पर विरोधी गोष्टींचा त्याग करून एकमेकांशी प्रेमाने वागतील वागवतील तर जगाचे पूर्ण कल्याण होईल. कारण विद्वानांमधील विरोधामुळे अविद्वानांमधील वैमनस्य वाढते त्यामुळे नाना प्रकारची दुःखे वाढतात आणि सुखाची हानी होते. स्वार्थी लोकांना ही हानी प्रिय असते, तिने सर्व मानवांना दुःखाच्या सागरात बुडविले आहे.

             त्यांच्यापैकी (मानवांपैकी) जो कोणी सार्वजनिक हित लक्षात घेऊन पुढे सरसावतो त्याला विरोध करण्यास स्वार्थी लोक तयारच असतात. ते त्याच्या मार्गात अनेक प्रकारची विघ्ने उभी करतात. परंतु 'सत्यमेव जयते नानृतं, सत्येन पंथा विततो देवयानः म्हणजे नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो, सत्यानेच विद्वानांचा मार्ग प्रशस्त होतो. असा दृढनिश्चय मनात बाळगल्यास आप्त लोक परोपकार करण्याच्या बाबतीत उदासीन होता सत्य अर्थाचा प्रकाश करण्यापासून कधी दूर जात नाहीत.

            'यत्तदग्रे विशामिव परिणामेS अमृतोपमम् हे गीते चे वचन आहे. हा मोठा दृढ़ निश्चय आहे. त्याचा अर्थ असा की जी जी विद्या धर्मप्राप्तीची कर्मे आहेत ती करताना प्रथम विषासारखी वाटतात नंतर अमृता सारखी बनतात. या गोष्टी मनात ठेवून मी या ग्रंथाची रचना केली आहे. श्रोते आणि वाचक यांनी पहिल्यापासूनच याच्याकडे प्रेमाने पाहावे आणि या ग्रंथाचे खरेखुरे तात्पर्य जाणून घेऊन यथायोग्य ते करावे.

              या ग्रंथाची रचना करताना मी असे अभिप्राय मनासमोर ठेवले आहे की सर्व पंथां मधे ज्या गुप्त किंवा उघड अशा गोष्टी आहेत त्या प्रकाशात आणून विद्वान अविद्वान अशा सर्व लोकांसमोर त्या मांडल्या आहेत. त्यायोगे सर्वांकडून सर्व गोष्टींचा विचार केला जावा त्यांनी परस्परांचे प्रेमी होऊन एका सत्याचे अनुसरण करावे.

              जरी मी आर्यावर्तात जन्मलो आणि येथेच राहतो तरी पण या देशातील विविध पंथांच्या खोट्या गोष्टींचा पक्ष घेता जे काही खरे आहे त्यावरच मी प्रकाश टाकतो. दुसऱ्या देशातील वा पंथांतील लोकांच्या बाबतीतही माझे हेच अभिप्राय आहेत. स्वदेशातील लोकांशी मनुष्योन्नति च्या बाबतीत माझे जे वर्तन आहे तसेच वर्तन परदेशी लोकांसाठी सर्व सज्जनांनीही वर्तन ठेवावे. कारण मी ही जर कुणा एकाचा पक्षपाती झालो असतो तर आजकाल आपल्या मताची स्तुति, मंडन प्रचार करून, इतरांच्या मतांची निंदा, खंडन प्रतिबन्ध करणारे जे लोक आपल्याला दिसतात त्यांच्या सारखा मी ही झालो असतो. परंतु असे करणे माणुसकीला सोडून आहे. कारण ज्या प्रमाणे पशु बलवान बनून निर्बलांना त्रास देतात आणि मारुनही टाकतात त्याप्रमाणे माणसे मानव शरीर मिळूनही तसेच वागू लागली तर ते मनुष्य स्वभावाला धरून नसून अशी माणसे पशुवत आहेत. या उलट जो बलवान बनून दुबळयांचे रक्षण करतो त्यालाच माणूस असे म्हणता येते. जो कोणी स्वार्थाने आंधळा बनून इतरांची हानी मात्र करतो तो पशूंचा मोठा भाऊ आहे.

                आता आर्यावर्त्त विषयी मी मुख्यतः अकराव्या समुल्लासापर्यंत लिहिले आहे. या समुल्लासांमध्ये जे सत्य मत मांडलेले आहे ते वेदोक्त असल्यामुळे मला सर्वथा ग्राह्य आहे. आणि नविन पुराणांतील तंत्र आदि ग्रंथांतील ज्या गोष्टींचे मी खंडन केले आहे त्या सर्वस्वी त्याज्य आहेत.
                 बाराव्या समुल्लासात चार्वाकाच्या मताची चर्चा केलेली आहे. सध्या ते मत जवळजवळ अस्ताला गेलेले आहे. हा चार्वाक बौद्ध जैन यांच्यापेक्षा अनीश्वरवादाशी अधिक संबद्ध आहे. तो चार्वाक सर्वांहुन नास्तिक आहे. त्याच्या प्रयत्नान्ना आळा घालणे जरूर आहे. कारण मिथ्या गोष्टींना आळा घातला नाही तर जगात पुष्कळशे अनर्थ माजतील.

                 चार्वाकाचे जे मत आहे ते बौद्ध जैन मता सारखेच आहे ते विवेचन बाराव्या समुल्लासात केले आहे. बौद्ध जैन यांची मते चार्वाकाच्या मतांशी जुळणारी आहेत. थोडाफार विरोध ही आहे. जैन मत ही बहुतांशी चार्वाक बौद्ध मतांशी मिळते जुळते आहे तरी काही बाबतीत भेद ही आहे. त्यामुळे जैन मत ही वेगळी शाखा समजली जाते. त्या मतातील वेगळेपणा बाराव्या समुल्लासात दाखवून दिला आहे. यथा योग्य तेथे समजून घ्यावे. बौद्ध जैन पंथां विषयीही लिहिले आहे.

                या पैकी बौद्धांच्या दीपवंशादि प्राचीन ग्रंथांमध्ये बौद्धमताविषयीसर्वदर्शनसंग्रहमध्ये जे काही आले आहे त्याचा उल्लेख आम्ही केला आहे. जैनांचे सिद्धांत सांगणारे ग्रंथ पुढील प्रमाणे आहेत :-

  मुलसूत्र: () आवश्यकसूत्र, () विशेष आवश्यकसूत्र, () दशवैकालिकसूत्र, () पाक्षिकसूत्र.
११ अंगे()आचारांगसूत्र, ()सुगडांगसूत्र, ()थाणांगसूत्र, ()समवायांगसूत्र, ()भगवती सूत्र, ()ज्ञातधर्मकथासूत्र, ()उपासकदशासूत्र, ()अन्तगडदशासूत्र, ()अनुत्तरोववाईसूत्र, (१०)विपाकसूत्र, (११)प्रश्नव्याकरणसूत्र.

 १२ उपांगे: ()उपवाईसूत्र, ()रावप्सेनीसूत्र, ()जीवाभिगमसूत्र, ()पन्नगणासूत्र, ()जम्बूद्वीपपन्नतीसूत्र, ()चंदपन्नतीसूत्र, ()सुरपन्नतीसूत्र, ()निरियावलीसूत्र, ()कप्पियासूत्र, (१०)कपवडीसयासूत्र, (११)पूप्पीयासूत्र, (१२)पुप्प्यचुलियासूत्र.

कल्पसूत्रे: ()उत्तराध्ययनसूत्र, ()निशीथसूत्र, ()कल्पसूत्र, ()व्यवहारसूत्र, ()जीतकल्पसूत्र.

छेद: () महानिष्ठबृहद्वाचनासूत्र, () महानिशिथलघुवाचनासूत्र, () मध्यमवाचनासूत्र, () पिंडनिरुक्तिसूत्र, () औषधनिरुक्तिसूत्र, () पर्यूषणासूत्र.

१० पयन्नसूत्रे: ()चतुस्सरणसूत्र, ()पंचखाणसूत्र, ()तदुलवैयालिकसूत्र, ()भक्तिपरिज्ञानसूत्र, ()महाप्रत्याख्यानसूत्र, ()चंदाविजयसूत्र, ()गणीविजयसूत्र, ()मरणसमाधिसूत्र, ()देवेन्द्रस्तवनसूत्र  (१०)संसारसूत्र, शिवाय नंदिसूत्र योगोद्धारसूत्र ही देखील प्रमाणित मानली जातात.

पंचांगे: () पूर्वीच्या सर्व ग्रंथांवरील टिका, () निरुक्ति, () चरणी, () भाष्य, हे चार अवयव आणि सर्व मूळ ग्रंथ मिळून पंचांग म्हटले जाते.

 (श्वेताम्बर जैनांतील) ढ़ूँढ़िया पंथाचे लोक, अवयव मान्य करीत नाहीत. या व्यतिरिक्त, इतरही अनेक ग्रंथ जैन लोक मानतात. त्यासम्बन्धी विशेष मत बाराव्या समुल्लासात पाहावे.

            जैनांच्या ग्रंथांत पुनरुक्तीचे लाखो दोष आहेत. त्यांचा असाही स्वभाव आहे की आपला जो ग्रंथ इतर पंथाच्या हातात असेल, अथवा छापलेला असेल त्याला काही लोक अप्रमाणित मानतात. त्यांची ही गोष्ट चुकीची आहे कारण एखाद्या ग्रंथाला कोणी मान्यता दिली अथवा नाही दिली म्हणून काही तो ग्रंथ जैन मताबाहेर होत नाही. ज्या ग्रंथाला कुणाचीच मान्यता नसेल कुणाही जैनाने त्याला त्याला कधीच मान्यता दिली नसेल असा ग्रंथ अग्राह्य होऊ शकतो. परंतु ज्याला कोणत्याही जैनाची मान्यता प्राप्त झालेली नाही, असा एकही ग्रंथ नाही. म्हणून जो कोणी जो ग्रंथ मानीत असेल त्या ग्रंथातील विषयाचे खंडन-मंडन त्याच्यासाठीच आहे असे समजले जाते. परंतु असे अनेक लोक आहेत की जे त्या ग्रंथा संबंधी जाणतात त्याला मानतात, तरीही सभेत किंवा वाद विवादामध्ये बदलून जातात. यामुळे जैन लोक आपले ग्रंथ लपवून ठेवतात. ते इतर मताच्या लोकांना देत नाहीत, ऐकवित नाहीत किंवा वाचू देत नाहीत. कारण त्या ग्रंथामध्ये अशा काही असंभव गोष्टी लिहिलेल्या आहेत की त्यांची उत्तरे  जैनांना देता येत नाहीत. खोटी गोष्ट सोडून देणे हेच तिचे उत्तर होय.

              तेराव्या समुल्लासात ख्रिस्ती लोकांचे मत लिहिले आहे. हे लोक बायबल ला आपला धर्म ग्रंथ समजतात. त्यासंबंधीचे खास विवेचन तेराव्या समुल्लासात पहावे आणि चौदाव्या समुल्लासात मुसलमानांच्या मता संबंधी लिहिले आहे. हे लोक कुराणाला आपल्या मताचा मूळ ग्रंथ मानतात. त्यांच्या विषयी चौदाव्या समुल्लासात सविस्तर विवेचन पहावे आणि त्यानंतर वैदिक मताविषयी लिहिले आहे.
              
या ग्रंथकर्त्यांच्या तात्पर्याकडे जो कोणी विरुद्ध मनभावनेतून पाहील त्याला काहीच माहिती होणार नाही. कारण वाक्यार्था च्या बोधात चार कारणे असतात-आकांक्षा, योग्यताआसत्ति तात्पर्य. या चारही गोष्टी ध्यानात ठेवून जो कोणी ग्रंथाचे वाचन करतो तेंव्हा त्याला ग्रंथाचा अर्थ योग्य प्रकारे कळतो.

आकांक्षा’: कोणत्याही विषयावर वक्ता आणि वाक्यातील पदे यांची आकांक्षा परस्पर सम्बद्ध असते.
योग्यता’: ती म्हटली जाते की ज्याच्याकडून जे काही होऊ शकते. उदाहरणार्थ, पाण्याने सिंचन करणे.
आसत्ति’: ज्या पदाचा ज्या अन्य पदाशी सम्बन्ध असतो त्याला त्या पदाच्या जवळ ठेवून बोलणे अथवा लिहिणे.
तात्पर्य’: ज्या हेतुने वक्ता शब्दोच्चारण करतो अथवा लेखक लेख लिहितो त्या हेतुशी त्याचे वचन अथवा लेखन सम्बद्ध करणे.
                   
            अनेक हट्टी दुराग्रही लोक वक्त्याच्या अभिप्रायाविरुद्ध कल्पना करतात विशेषतः एखाद्या विशिष्ट मताचे किंवा पंथाचे लोक असे करतात. कारण एखाद्या मताच्या आग्रहामुळे त्यांची बुद्धि अज्ञानरूपी अंधकारामुळे नष्ट होते. म्हणून ज्याप्रमाणे मी पुराणे, जैनांचे ग्रंथ, बायबल कुराण यांच्याकडे प्रथमच वाईट नजरेने पाहता त्यांच्यातील गुणांचे ग्रहण दोषांचा त्याग करतो आणि इतर मानवांच्या उन्नतिसाठी प्रयत्न करतो त्याप्रमाणे सर्वांनी करणे उचित होय.

               या पंथाचे थोडेसेच दोष मी दाखविले आहेत. ते पाहुन लोक सत्यासत्य मताचा निर्णय करू शकतील आणि सत्याचा स्वीकार असत्याचा त्याग करण्यास समर्थ बनतील. कारण मानव जातीला भडकवून, परस्परांविरुद्ध मत निर्माण करून एकमेकांना शत्रु बनवून कलह माजवणे ही गोष्ट विद्वानांच्या स्वभावा बाहेर आहे. हा ग्रंथ वाचून अडाणी लोक उलटाच विचार करतील. तथापि बुद्धिमान लोक याचा योग्य तो अभिप्राय समजून घेतील. म्हणून माझे परिश्रम सफल झाले असे मी समजतो; आणि माझे म्हणणे सर्व सज्जनांसमोर मी ठेवतो.

            वाचकांनी हा ग्रंथ स्वतः वाचून इतरांना वाचून दाखवून माझे परिश्रम यशस्वी करावेत. त्याचप्रमाणे पक्षपात करता सत्यर्थाचा प्रकाश करणे हे माझे इतर सर्व सुज्ञांचे मुख्य कर्तव्य आहे.

सर्वात्मा सर्वान्तर्यामी सच्चिदानंद परमात्मा कृपा करून हा आशय विस्तृत चिरस्थायी करो.
अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वरशिरोमणिषु
इति भूमिका

स्थान: महाराणाजींचे उदयपुर.                                                   (स्वामी) दयानंद सरस्वती.
भाद्रपद शुक्ल पक्ष, संवंत १९३९.